महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५’ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले आहे , त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.
| ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक | https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/ |
| ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधीI | २६/०४/२०२५ ते १०/०५/२०२५ |
| ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक | १०/०५/२०२५ रोजी २३:५९ वाजे पर्यंत |
| प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी | परीक्षेच्या ७ दिवस आधीपासून |
| Application Fee | खुला प्रवर्ग : ९५० इतर : ८५० |
| ऑनलाईन परीक्षा दिनांक | २४/०५/२०२५ ते दि. ०५/०६/२०२५ |
(अ) पासपोर्ट साईज फोटो – उमेदवाराने त्याचा नवीनतम स्कॅन केलेला पासपोर्ट साईज (४.५ सेमी -X ३.५ सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान – 200 X 300 pixels
फाईल साईज – 20 kb – 50 kb
(ब) स्वाक्षरी – उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोडकरणे आवश्यक आहे.
आकारमान – 140 X 60 pixels
फाईल साईज – 10kb – 20 kb
(क) डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा – उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी -(३ सेमी X ३ सेमीपांढऱ्या कागदावर काळ्या/निळ्या शाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणेआवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी वापरावी.
आकारमान – 240 X 240 pixels in 200 DPI
फाईल साईज – 20 kb – 50 kb
(ड) स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र
उमेदवाराने त्याच्या स्व-हस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (१० सेमी X ५ सेमी पांढऱ्या कागदावर काळ्या/निळ्या शाई मध्ये लिहिलेले) अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान – 800 X 400 pixels in 200 DPI
फाईल साईज – 50 kb – 100 kb
स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमुना
“I, (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid and subject to satisfactory document verification by MSCE. I will present the supporting documents as and when required. If at any stage of the selection process it is found that I do not satisfy any of the conditions for the post, my candidature is liable to be cancelled and no further queries will be entertained by MSCE in this regard and MSCE shall not be liable in any way whatsoever.”
सदरचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्येच लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोडकरणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले, आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. (लिहू न शकणाऱ्या अंध अथवा अल्पदृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतःच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.)