Resume म्हणजे तुमच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक कौशल्यांचा संक्षिप्त परिचय. चांगला Resume तयार करणं ही नोकरी मिळवण्यासाठी पहिली पायरी असते. खाली दिलेल्या टिप्स आणि मार्गदर्शनानुसार रेसुमे लिहिण्याची प्रक्रिया तुम्हाला समजेल.
Resume लिहिताना घ्यावयाची काळजी
Resume लिहिताना खालील गोष्टींवर विशेष लक्ष द्या:
- सिंपल आणि स्पष्ट स्वरूप: Resume नेहमी साध्या आणि वाचायला सोप्या भाषेत लिहावा.
- एकाच पानात पूर्ण माहिती: शक्यतो Resume एक पानाचाच असावा.
- प्रत्येक शब्द महत्त्वाचा: अनावश्यक शब्द टाळा, फक्त महत्त्वाच्या गोष्टींचाच उल्लेख करा.
Resume मुख्य भाग
(1) वैयक्तिक माहिती (Personal Information):
रेसुमेच्या सुरुवातीला खालील माहिती असावी:
- पूर्ण नाव
- संपर्क क्रमांक
- ईमेल पत्ता
- सध्याचा पत्ता
उदाहरण:
नाव: युवराज जाधव
संपर्क: ९७६६३९२५३८
ईमेल: yuvajadhav@gmail.com
(2) उद्दिष्ट (Objective):
तुमचं उद्दिष्ट संक्षिप्त आणि नोकरीशी संबंधित असावं.
उदाहरण:
“एक जबाबदार पदावर कार्य करताना माझं ज्ञान आणि कौशल्ये वापरून कंपनीच्या विकासामध्ये हातभार लावणे.”
(3) शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications):
तुमच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख उलट क्रमाने करा (सर्वात शेवटचं शिक्षण प्रथम दाखवा).
उदाहरण:
- एम.एस्सी. (कम्प्युटर सायन्स) – पुणे विद्यापीठ – २०२२
- बी.एस्सी. (कम्प्युटर सायन्स) – मुंबई विद्यापीठ – २०२०
(4) व्यावसायिक अनुभव (Work Experience):
जर अनुभव असेल तर त्याचा उल्लेख करा.
उदाहरण:
- सॉफ्टवेअर डेव्हलपर, इन्फोसिस (२०२२-आजपर्यंत):
- नवीन सॉफ्टवेअर तयार करणे आणि टेस्टिंग करणे.
- टीम मॅनेजमेंट आणि क्लायंटसाठी प्रोजेक्ट सादर करणे.
(5) कौशल्ये (Skills):
तुमचं नोकरीसाठी उपयुक्त कौशल्य लिहा.
उदाहरण:
- प्रोग्रामिंग: Python, Java, C++
- कम्युनिकेशन कौशल्य
- समस्या सोडवण्याची क्षमता
(6) पुरस्कार आणि प्रमाणपत्रे (Awards and Certifications):
तुमचं महत्त्वाचं प्रमाणपत्र किंवा पुरस्कार लिहा.
उदाहरण:
- डेटा सायन्समध्ये प्रमाणपत्र, Coursera – २०२१
- बेस्ट एम्प्लॉयी अवॉर्ड – २०२३
(7) भाषा कौशल्य (Language Skills):
तुम्ही कोणत्या भाषा वाचू, लिहू आणि बोलू शकता ते नमूद करा.
उदाहरण:
- मराठी – मातृभाषा
- हिंदी – प्रवाही
- इंग्रजी – प्रवाही
Resume लिहिताना टाळावयाच्या चुका
- स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुकांपासून दूर राहा.
- सतत मोठ्या परिच्छेदांचा वापर टाळा.
- खोट्या माहितीचा उल्लेख करू नका.